कार्यकर्त्यांच्या जाणीवा-नेणीवा प्रगल्भ करण्यासाठी प्रा. रणजित परदेशी यांनी दिलेल्या योगदानाने येवल्याची अभिवादन सभा गहिवरली

येवला (प्रतिनिधी) : प्रा.रणजीत परदेशी म्हणजे मार्क्स-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा समाज निर्माण व्हावा म्हणून कार्यकत्यांच्या जाणीवा-नेणीवा प्रगल्भ करण्यासाठी झटलेला एक तत्त्वचिंतक, बुद्धिवादी संशोधक, आणि एक अखंड ऊर्जा स्रोत आमच्यातून गेल्याच्या भावनेने येवल्यात परदेशी यांच्या जाण्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित अभिवादन सभेत कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
३ मार्च २०२४ रोजी प्रा. परदेशी यांचे मालेगाव येथे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याची कधीही भरून येणार नाही अशी आणि झालेली आहे. त्यात प्रामुख्याने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि मुख्य म्हणजे वर्ग जाती-स्री दास्य अंताच्या लढाईतील एक सेनापती गेल्याचे दुःख अवर्णनीय असल्याच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. ज्या महाविद्यालयात प्रा.परदेशी यांनी तीस वर्ष प्राध्यापक म्हणून काम करीत हजारो विद्यार्थी, कार्यकर्ते आणि अभ्यासक घडविले, त्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयात या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.रामप्रसाद तौर होते. तर विचार पिठावर प्रा. परदेशी यांचे ज्येष्ठ सहकारी प्रा. गो. तू. पाटील, अशोक परदेशी, मंगला गोसावी, प्राचार्य भाऊसाहेब गमे हे होते.
राष्ट्र सेवा दल या परिवर्तनवादी चळवळीत प्रा. परदेशी यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार तथा प्राच्य विद्या पंडित, ख्यातनाम क्रांतिकारी विचारवंत, तत्वज्ञ आणि बुद्धिवादी कॉम्रेड शरद पाटील यांच्या सहवासात राहून प्रा. परदेशी यांनी अथक परिश्रम घेत तन- मन-धनाने अनेक पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते घडविले, त्यापैकी महाराष्ट्रातील सुमारे 200 पेक्षा अधिक सक्रिय कार्यकर्ते या अभिवादन सभेला आवर्जून उपस्थित होते.
या अभिवादन सभेत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यात प्रामुख्याने प्रा. डॉ. उमेश बगाडे, प्रा. प्रमोद वाघदरीकर, प्रा. गो. तू. पाटील, अँड. दिलीप कुलकर्णी, प्रा. मनीषा निफाडे, युवराज बावा, राजू जाधव, महेश पेंदणेकर, सिद्धार्थ जगदेव, दत्ता वायचळे अँड. एकनाथ ढोकळे, प्रा. सचिन गरुड, भास्कर कोल्हे, नानासाहेब पटाईत, निर्मला कुलकर्णी, प्राचार्य भाऊसाहेब गमे, प्रा. जितेश पगारे, विक्रम गायकवाड, धनंजय कुलकर्णी, श्याम मुडे चंद्रकांत साबरे, छाया मुराळकर, माधुरी जगताप, प्रा. मेहबूब सय्यद, भागिनाथ पगारे, राहुल कदम, विद्या कसबे, प्रा. प्रकाश खळे, बापुराव पगारे, बाबुराव बनसोड, राजू वैराळ, बाळराजे पाटील, सुदीप कांबळे, श्रीकांत काळोखे, मनोज चोपडे आदींनी प्राध्यापक परदेशी यांच्या कार्याचे साक्षीदार असल्याचे सांगत त्यांचे क्रांतिकारी कार्य पुढे चालू ठेवण्याच्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी सुवर्णा चव्हाण यांनी, प्रा. रणजित परदेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ येवला महाविद्यालयात दरवर्षी वादविवाद स्पर्धांचे आयोजन केले जाणार असल्याचे घोषित केले.
सूत्रसंचालन राष्ट्र सेवादलाचे राज्य अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्याचे प्रमुख किशोर जाधव यांनी केले. समारोप प्रा. जितू पगारे यांच्या मोबाईल मध्ये प्रा. रणजीत परदेशी यांच्या स्वरचित आणि त्यांच्याच आवाजात असलेल्या एका क्रांतीकारी कवितेने झाला. अभिवादन सभा पार पडावी म्हणून कॉम्रेड भगवान चित्ते, चहाबाई चित्ते, आनंद चित्ते आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सभेस संजय जाधव, अतुल खरात, मंगला खरात, दर्शना सोनवणे, शिवाजी वाबळे, धोंडीराम पडवळ, समीर देशमुख, दिलीपसिंग परदेशी, राहुल कदम, सुरेश खळे, प्रणव कोकणे, निळकंठ कापसे, सुभाष चिंचाने, सतीश सातपुते, विकास मोरे, योगेश सपकाळ, संतोष पेडणेकर, प्रकाश विधाते, श्रावण सोनवणे, राकेश अहिरे, संजय गांगुर्डे, शंकर मांजरे, संध्या पगारे, निर्मला गुंजाळ, कामिनी जगदेव, पुष्पा बागुल, सुंदर जाधव, सुनिता जाधव आदींसह महाराष्ट्रातून कार्यकर्ते उपस्थित होते.