येवल्यात कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर… सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम संपन्न
तीन हजारांवर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

येवला (प्रतिनिधी) : गप्पा, गोष्टी, मिमिक्री अन् मजेदार खेळाच्या सोबतीने येवल्याच्या तब्बल तीन हजार महिलांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम रंगला. देवका परदेशी यांनी होम मिनिस्टरचे विजेतेपद मिळवत येवल्याची अस्सल पैठणीचे पारितोषिक मिळविले.
कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने खास महिलांसाठी हळदीकुंकू निमित्त होममिनीस्टर सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमाचे शहरातील राजे रघुजीबाबा बागेत आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे संस्थापक युवा नेते कुणाल दराडे तसेच आमदार नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. झी टॉकीज फेम संदीप जाधव यांनी गप्पा, गाणी, गोष्टी, मिमिक्री, नृत्य मनोरंजक खेळ सोबतच उखाणे, नृत्य फुल कॉमेडी शो सोबत बक्षिसांची लयलुट करत मनोरंजनात्मक सादरीकरणातून महिलांना खळखळून हसविल्याने संध्याकाळी सात वाजता सुरू झालेला कार्यक्रम रात्री साडेदहा वाजेपर्यंत भरगच्च गर्दीत सुरू होता. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
देवका गणेश परदेशी यांनी होम मिनिस्टरचे विजेतेपद मिळवत येवल्याची अस्सल पैठणीचे पारितोषिक मिळविले. संगीता बाळासाहेब कसबे या द्वितीय क्रमांकाच्या सोन्याची नथच्या विजेत्या ठरल्या तर मेघा अतुल पवार यांनी तिसरे मिक्सरचे बक्षीस पटकावले. चतुर्थ बक्षीस सिद्धी प्रीतम गांगुर्डे (कुक्कर) यांनी, पाचवे बक्षीस दिपाली सिताराम खंडागळे (डिनर सेट) आणि सहावे बक्षीस अश्विनी ज्ञानेश्वर खैरमोडे (थर्मास) यांनी मिळवले. उपस्थित महिला प्रेक्षकांमधून देखील लकी ड्रॉ काढून वीस विविध बक्षिसे देण्यात आले.
माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, कुणाल दराडे, सुरेखा दराडे, मीना दराडे, अलका दराडे, डॉ. कविता दराडे, प्रियंका काकड आदींच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. संदीप जाधव, किरण वैराल, माधुरी वैराल यांच्या टीमने कार्यक्रमाचे मनमोहक सादरीकरण केले. कुणाल दराडे फाउंडेशनचे जयवंत खांबेकर, संजय शिंदे, विजय गोसावी, मयूर मेघराज, शिवाजी साताळकर, सुनील काटवे, मकरंद तक्ते, सुमीत गायकवाड, मंदार खैरे, स्वपील बाकळे, योगेश लचके, संजय गायकवाड, इम्रान शेख, हारुन शेख, मोहफिज शेख, प्रशांत जाधव, सिद्धार्थ धिवर आदीसह महिला सदस्या बबिता कोल्हे, कविता गोसावी, सुनीता लहरे, प्रिया वरपे, अर्चना लग्गड, आश्लेषा काळे, वैशाली चव्हाण, तृप्ती राजपूत, भाग्यश्री सोनवणे, सविता माहुलीकर, संगीता खांबेकर, सायली खंदारे, अनुजा भांबारे, पूनम टिभे, सोनल माळोकर, वैशाली चव्हाण, सोनल माळवे, दीपिका गुजराथी, उज्जवला पानमळे, सोनल पवार, वैशाली कवडे, नीता भागवत, गीतांजली माळोकर, राधिका डालकरी, प्राजक्ता खंदारे, कविता राऊत यांनी यशस्वी नियोजन केल