जनता पतसंस्थेचे संस्थापक दौलतराव ठाकरे पोलिसांच्या ताब्यात
मागील ३ वर्षा पासुन पोलीसांना देत होते गुंगारा

नाशिक (प्रतिनिधी) : येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर, जि. पालघर येथुन आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जि. नाशिक या संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक यांनी कट कारस्थान रचुन संगनमताने जाणुन बुजुन खोटया नोंदीद्वारे चुकीचे आर्थिक पत्रके तयार करून संस्थेचे ठेवीदार व सभासदांची फसवणुक करुन ठेवी स्विकारण्याची मर्यादा नसतांना जादा व्याज दराचे आमिष दाखवुन ठेवीदाराकडुन ठेवी गोळा करुन त्यांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची व सभासदांची रक्कम २९ कोटी २ लाख ४१५ रूपयांची फसवणुक केली म्हणुन दि. ०७/११/२०२२ रोजी येवला शहर पोलीस ठाणे । ३०२/२०२२, भा.दं. वि. कलम ४२०, ४०६, ४०९,१२० (ब) ३४ व महाराष्ट्र ठेविदार (वित्तीय संस्थामधिल) हितसंबधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण मार्फत चालु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्हयाचा आढावा घेवुन गुन्हे निर्गतीचे आदेश दिले होते. त्याअनुशंगाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधु, पोलीस उप अधिक्षक श्रीमती जे एम करंदीकर यांनी यातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पो.ह. प्रविण मासुळे, कैलास काकड, मोहन पवार यांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे यातील फरार आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर, जि. पालघर येथुन ताब्यात घेतले.
ठाकरे यांचे विरुध्द शहर पोलिस ठाण्यात सन २०२२ मध्ये आर्थिक फसवणुकीचे भादविस सह एमपीआयडी ५ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, ठाकरे यास न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. ३० ऑगस्ट २०२५ पावेतो पोलीस कस्टडी दिली असुन पुढील तपास सुरु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधु, पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, श्रीमती जे. एम. करंदीकर, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस अंमलदार प्रविण मासोळे, कैलास काकड, मोहन पवार, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने ही कामगिरी केली आहे.